डागा शासकीय रुग्णालयात थैलेसिमिया रुग्णांकरिता ‘मनोधैर्य’ उपक्रम

नागपूर :- डागा शासकीय रुग्णालय येथे सिकलसेल, हिमोफिलिया तसेच थैलेसिमिया रुग्णांकरिता वैद्यकीय अधीक्षिक डॉ. सीमा पारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोधैर्य उपक्रमास 19 जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली.

रुग्णालयाच्या हिमोफिलिया डे केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक समस्या समजून घेण्याकरिता मनसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे यांच्याद्वारे रुग्ण, डॉक्टर यांच्यामध्ये समूह चर्चेद्वारे रुग्णांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच रुग्ण व त्यांच्या पाल्यांकरिता विपश्यना, ध्यान साधनेचे सत्र आयोजित करण्यात आले.

बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी. समुपदेशक संजीवनी सातपुते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रचिती वाळके व हिमाटोलोजी समन्व्यक संदीप पोरटकर, समुपदेशक लीना गजभिये व इतर कर्मचाऱ्यांद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

निकी बारापात्रे, संजना जोशी सायकलिंगमध्ये अव्वल, खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धा 

Sun Jan 21 , 2024
नागपूर :- नागपुरातील निकी बारापात्रे आणि संजना जोशी खासदार क्रीडा महोत्सवातील सायकलिंग स्पर्धेत अव्वल ठरले. रविवारी (ता.21) सकाळी पार पडलेल्या सायकलिंग स्पर्धेत 21 वर्षाखालील मुले आणि मुलींमध्ये निकी व संजनाने बाजी मारली. दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकातून सायकलिंग स्पर्धेला सुरूवात झाली. 21 वर्षाखालील मुलांच्या गटात निकी बारापात्रे ने निर्धारित 21 किमी अंतर 30 मिनिट या सर्वोत्तम वेळेत पूर्ण केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com