संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शिवसेना (उबाठा) कन्हान व्दारे उध्दव ठाकरे च्या जन्मदिनी सेवाभावी उपक्रम.
कन्हान :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कन्हान व्दारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनी तारसा रोड चौक कन्हान येथे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते ऑटो चालकांना व वन्य प्राणी संरक्षण संस्थेचे सदस्याना प्रथोमचार साहित्य किट वाटप करून आगळावेगळा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आल्याने या कार्याचे शहरात चांगलेच कौतुक करण्यात येत आहे.
गुरूवार (दि.२७) जुलै ला सायंकाळी तारसा रोड चौक कन्हान येथील ऑटो स्टॉंड येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष कन्हान व्दारे रामटेक लोकसभा शिवसेना माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते कन्हान येथील ऑटो चालकांना कुठलिही दुर्घटना झाल्यास प्राथमिक उपचार करता यावा म्हणुन प्रथोमचार साहित्य किट चे बाळु नागदेवे, लक्ष्मीनारायण बल्लारे, नरेन्द्र पात्रे, मुकुंद उब्रजकर, अरूण बावनकुळे, लियाकत खान, अशोक गुप्ता, अविनाश नागदेवे, शेखर पेटारे, जागेश्वर कश्यप,सुभाष गुप्ता, नितिन लिखितकर, रामलाल कैथल, चंद्रकुमार नायडु, प्रदीप बावने, नंदु आबांगडे, सुरेस शेंडे, नंदु देशभ्रतार, सुनिल बाते, कैलास खोब्रागडे आदी सह ४० ऑटो चालकाना वाटप करण्यात आले. तसेच पारशिवनी तालुक्यात वन्य प्राण्याच्या संरक्षणा करिता सदैव तत्पर असलेले वाईल्ड अनिमल एण्ड नेचर रेस्क्यु बहुउद्देशिय संस्था कन्हान चे राम जामकर, आशीष महल्ले, अविनाश पासपलवार, राजकुमार बावने, प्रीतम ठाकुर, वैभव लक्षणे, कुणाल देऊळकर, रोहित शिंदे, विशाल इंगळे, प्रथमेश पगारे, नीलेश नेवारे, रहीम शेख आदी १२ सदस्याना अश्या प्रकारे ५२ प्रथोमचार साहित्य किट वाटप करून आगळा वेगळा सेवाभावी उपक्रम राबवुन शिवसेना पक्ष प्रमुख व कुटुंब प्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना माजी खासदार प्रकाश जाधव, पत्रकार मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, ऋृषभ बावनकर, आकाश पंडितकर, शिवसैनिक दिलीप राईकवार, नेवालाल पात्रे, जीवन ठवकर, हबीब शेख, बंटी हेटे, रूपेश सातपुते, शिव स्वामी, संतोष गिरी, सुभाष रोकडे, फजित खंगारे, हाफिज शेख, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, विशु गुप्ता, गणेश खांडेकर, निशांत जाधव, बाला खंगारे, लाला गुडधे, भुरा पात्रे, भारत मोकरकर, महेंद्र खडसे, सतिश नाडे, किशोर शेंडे, अनिश पात्रे, महेंद्र शेंडे, दिलीप गायकवाड, सु़भाष ढोके सह बहु संख्येने नागरिक उपस्थित होते.