स्वच्छ भारत अभियान : पीओपी मुर्ती विक्रेत्यांवर कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.18) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मयुर चौव्हान, अयोध्या नगर, नागपूर यांच्यावर फूटपाथवर सी आणि डी कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तनुश्री नर्सिंग होम, भगवान नगर, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शेख किराणा शॉप, राणीदुर्गावती चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशी नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रदिप काजवे, कमाल चौक, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. विजय मुर्ती भंडार, जरीपटका, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Tue Sep 19 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (18) रोजी शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 36900 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com