संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
सलग 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापतीपदी वर्णी
कामठी :- सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित असलेल्या कामठी पंचायत समितीच्या सभापतीपदी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे तर उपसभापतीपदी दिलीप वंजारी याची निवड करण्यात आली. तर या कामठी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत तब्बल 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापती उपसभापतीपदी वर्णी लागून एकहाती सत्ता मिळाल्याची आनंदाची बाब असल्याचे मनोगत माजी जी. प. अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी व्यक्त केले.
मागील 8 जानेवारी 2017 ला झालेल्या कामठी पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत चार कांग्रेस तर चार भाजप चे सदस्य निवडून आले होते तर 17 जानेवारी 2017 ला कामठी पंचायत समिती सभागृहात झालेल्या सभापती-उपसभापती निवडणुकीत फिफ्टी फिफ्टी ची स्थिती असल्याने ईश्वर चिट्ठीचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये सभापती पदावर ईश्वरचिट्ठीने भाजप चे उमेश रडके तर उपसभापती पदी कांग्रेस चे आशिष मल्लेवार निवडून आले होते तर यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपुष्टात आला होता मात्र ओबीसींचे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावरून दोन पंचायत व दोन जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती यात भाजप चे एक सदस्य कमी झाले होते तर या उपचूनावानंतर कांग्रेस चे सदस्य संख्या चार वरून पाच वर पोहोचली तर भाजप ची संख्या ही चार हुन तीन वर पोहोचलो. यानुसार कामठी पंचायत समिती च्या 8 सदस्य संख्येत कांग्रेस कडे बहुमत आहे.
तर आज 15 ऑक्टोबर 2022 ला कामठी पंचायत समिती सभागृहात पीठासीन अधिकारी तहसिलदार अक्षय पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली व बीडीओ अंशुजा गराटे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी पंचायत समिती सभापती पदासाठी कांग्रेस कडून दिशा चनकापुरे तर भाजप कडून पुनम मळोदे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता तर उपसभापती पदासाठी कांग्रेस चे दिलीप वंजारी तर भाजप चे सविता जिचकार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. हात वर पद्ध्तीने केलेल्या मतदानात सभापती पदासाठी उमेदवार दिशा चनकापुरे यांना 5 मते तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार पुनम मळोदे यांना 3 मते प्राप्त झाली तसेच उपसभापती पदासाठी दिलीप वंजारी यांना 5 मते तर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप उमेदवार सविता जिचकार यांना 3 मते मिळाली. त्यानुसार सभापतीपदी दिशा चनकापुरे तर उपसभापती पदी दिलीप वंजारी निवडून आले.या निवडणुकीत हात वर पद्ध्तीने झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य कांग्रेसच्या दिशा चनकापूरे, दिलीप वंजारी,सोनू कुथे,आशिष मललेवार,सुमेध रंगारी तसेच भाजप चे पूनम मालोदे, सविता जिचकार, उमेश रडके यांनी सहभाग दर्शविला होता.
निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार सभापती दिशा चनकापुरे व उपसभापती दिलीप वंजारी यांच्यावर माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, जी प सदस्य अवंतिका लेकुरवाडे ,जी प सदस्य दिनेश ढोले, माजी जी प सदस्य सरीता रंगारी,अनुराग भोयर,माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान,रत्नदीप रंगारी, निखिल फलके,वारेगाव ग्रा प च्या वतीने तसेच समस्त कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने गुलालाची उधळण करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.