कामठी तालुक्यात बकरी ईद उत्साहाने साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा परमेश्वराप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .यानिमित्ताने बकरे, मेंढ्या आदींची मोठ्या प्रमाणात कुर्बानी देण्यात आली तर यावर्षी बकऱ्यांच्या बाजारात सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ईद निमित्त कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील पटांगण इदगाह येथे सकाळी साडे आठ वाजता मौलाना मसुद यांच्या नेतृत्वात अनुयायांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक नमाज पठण करण्यात आले.याप्रसंगी सामूहिक नमाज पठणासाठी 250 च्या वर अनुयायांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच शहरातील 42 मस्जिद मध्ये सुद्धा नमाज अनुयायांनी नमाज पठण केले.या इदगाह वर सामूहिक नमाजाचे अधिपत्य मौलाना मकसूद आलम यांनी केले .

सदर इदगाह मध्ये सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर उपस्थित समस्त मुस्लिम अनुयायांना उपस्थित एसीपी खांडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे ,वाहतुक पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी गळाभेट देऊन बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आजचा आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आल्याने दोन्ही पर्व कौमी एकतेच्या वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस विभाग विशेष लक्ष केंद्रित करून होते तर दरवर्षी ईद निमित्त नेमलेल्या इदगाह येथे प्रमुख राजकीय नेते मंडळी उपस्थिती दर्शवून अनुयायांना ईद च्या शुभेच्छा देतात मात्र यावर्षी या परंपरेला ब्रेक लागला असून यावर्षी बकरी ईद निमित्त इदगाह येथे एकाही वरिष्ठ राजकीय नेते पुढारी मंडळींनी उपस्थिती दर्शविली नव्हती हे इथं विशेष!

-बकरी ईद ‘ईद -उल -अजहा’ही बलिदानाची ईद आहे .मुस्लिम मान्यतेनुसार हजरत इब्राहिम यांनी आपले पुत्र हजरत इस्माईल यांना याच बकरी ईद च्या दिवशी अल्लाहच्या आदेशानुसार अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते मात्र अल्लाहणे हजरत इस्माईल लास जीवनदान दिले त्याच त्याग आणि बलिदानाचा स्मूर्ती प्रित्यर्थ हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जातो या दिवशी कुर्बाणीला विशेष महत्व आहे या दिवशी कुर्बानी दिली जाते व गरिबांना अन्नदान दिले जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान पुलिस की नाक के नीचे अवैध देशी,महुआ शराब की बिक्री 

Thu Jun 29 , 2023
– आबकारी कर का नुकसान व कन्हान पुलिस के बीट कर्मी उठा रहे मासिक देन नागपुर :- कन्हान थाना आये-दिन विवादों में बना रहता हैं.इस थानांतर्गत सब सुस्त व मस्त है,दूसरी ओर जिले के SP (पुलिस अधीक्षक) को छापामार कार्रवाई करनी पड़ रही हैं.वर्त्तमान में रमेश ढोमणे का महुआ शराब और रामनाथ का देशी शराब का अड्डा स्थानीय पुलिस के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com