संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कामठी तालुक्यातील प्रत्येक गावात आशा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर मानधन देण्यात येत असल्यामुळे या आशा स्वयंसेविकात नाराजगीचा सूर वाहत असून मानधना ऐवजी वेतन देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
आशा स्वयंसेविकाना आरोग्य संस्थेमधील प्रसूतीमध्ये वाढ करणे,मलेरिया, कर्करोग,साथीच्या रोगाबद्दल जनजागृती करणे,कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रचार, गर्भ निरोधक साहित्याचे वाटप करणे,ताप, खोकला यावर संचालित औषधांचे वाटप करणे,माता बाल आरोग्य विषयी प्रबोधन करणे,लसीकरण, प्रसूती पूर्व तपासणी आदी कामे करावी लागतात.हि कामे कधीकधी रात्री बेरात्री सुद्धा करावी लागतात.त्याच्या योगदानाचे फलित म्हणूनच की काय मातांच्या प्रसूती मृत्यू मध्ये घट झाली आहे .इतकेच नव्हे तर कोरोना महामारीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना दररोज घरी भेट देऊन त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची तपासणी करून औषधोपचार देण्याचे मौलिक कार्यसुद्धा केले आहे.
ही सर्व कामे करताना आशा स्वयंसेविकाना मासिक सभेत उपस्थित राहल्यास अल्प मानधन तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याकडून अल्पोहार आणि मानधन देण्यात येतात.कामाच्या मोबदल्यात क्षयरोगाला डॉटस ,उपचार पूर्ण झाल्यावर ,हिवतापाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यावर,गंभीर आजारी व्यक्तीस दवाखान्यात दाखल केल्यास ,कृष्ठरोगाचे नवीन रुग्ण शोधल्यास ,संसर्ग झालेल्या रुग्णास औषधोपचार पूर्ण केल्यास , असंसर्गिक रुग्णास औषधोपचार केल्यास,लसीकरनासाठी वर्षाकाठी अत्यल्प मानधन असे स्वरूप ठरवून देण्यात आले आहे.महत्वाची जवाबदारी सांभाळनाऱ्या आशा स्वयंसेविकाना मात्र महिन्याभरात तोकडा मानधनाच्या रकमेवर जगावे लागत आहे.यामुळे आता आशा स्वयंसेविकावरच निराश होण्याची पाळी आली आहे.आशा स्वयंसेविकाना मानधना ऐवजी दरमहा 5 हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
@फाईल फोटो