मुंबई :- व्हीलचेअर क्रिकेट चमूच्या सदस्यांनी नीलोत्पल मृणाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
व्हीलचेअर क्रिकेट खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना मुंबई तसेच राज्यातील इतर सार्वजनिक विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या मैदानावर सराव करु द्यावा, या दृष्टीने विद्यापीठांना सूचना कराव्या अशी मागणी यावेळी दिव्यांग खेळाडूंनी केली.
अनेक दिव्यांग खेळाडू व क्रिकेटपटू गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असून खासगी क्लब / जिमखाना येथे जाऊन सराव करणे त्यांना परवडत नाही.
विद्यापीठाच्या मैदानावर सरावासाठी दिव्यांगांना मनाई केली जाते असे सांगून विद्यापीठांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी मैदाने वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिव्यांग खेळाडूंनी केली.