संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र ४ ऑगस्ट – आजादी का अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत आनंदनगरातील समाज भवनात आधार कार्ड नवीनीकरण आणि अद्यावतीकरण करिता शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय कामठीच्या सौजन्याने करण्यात आले
आधार कार्ड शिबिराचे उदघाटन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले या आधार कार्ड शिबिरात जवळपास ४५ आधार कार्ड नव्याने बनविण्यात आले तसेच ६० कार्डाचे अद्यावतीकरण करण्यात आले
आधार कार्ड शिबिराच्या यशस्वीतेसाठी उज्वल रायबोले विक्की बोंबले,जितेंद्र खोब्रागडे, दुर्गेश ढोके, रोहित मेश्राम, दिनेश खेडकर, सजल यादव, तुषार नगरकर,राजकुमार गजभिये,सुनील वक्कलकर,संतोष पुरी,करण दुर्गा, सरोजनी समरीत,शितल सोनावणे,रुपाली सोनकुसरे, ममता गोखले, कपिल भिमटे,नितीन ऊके,प्रज्ज्वल सोलंकी,अंगणवाडी सेविका तारा जगणे यांनी सहकार्य केले.