अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध धडक मोहीम

नागपूर  :- पोस्टे कुही येथील स्टाफ पोस्टे कुही हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, उमरेडकडे जाणाऱ्या रोडचे दिशेने एक इसम मोटरसायकलने दारूची अवैधरीत्या वाहतुक करीत आहे. अशा माहितीवरून हिरो कंपनीची सि.डी. डिलक्स मो.सा. क. एम. एच.-४०/ सी.वी. ५५७७ ने अवैधरीत्या वाहतुक करणान्या इसमास नाकाबंदी केली असता आरोपी नामे सुनिल जालंदर परतेकी वय ४४ वर्ष रा. उंदरी ता. उमरेड जि. नागपूर याच्या ताब्यातून विनापरवाना व अवैधरीत्या मोटरसायकलवर एका खाकी रंगाच्या थैलीत १०० निषा देशी दारू संत्रा नं. १ व्या ९० एम. एल. च्या प्रत्येकी किंमती ३५/- रू. प्रमाणे एकुण किमंती ३,५००/- रू. व हिरो कंपनीची सि. डी. डिलक्स मो.सा. क. एम. एच.-४०/सी.वी.-५५७७ किंमती ५०,०००/- रूपये असा एकुण ५३,५००/-रु. चा मुद्देमाल मिळून आला. पोस्टे कुही येथे आरोपीविरूद्ध कलम ६५ (अ), (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिनांक १६/०७/२०२४ रोजी पोस्टे केळवद येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलॉग करीत असता यातील आरोपी नामे श्याम अनोद उर्फ पांडया चौक सोलंकी, वय ४२ वर्ष, रा. ढालगावखखैरी ता. सावनेर याचे दारूबाबत घराची परझडती घेतली असता त्याचे ताब्यातून १) पांढऱ्या रंगाचे डबकीत प्लॉस्टीक सीलबंद १५ लिटर मोहाफूल गावठी दारू प्रत्येकी ५० रु लिटर प्रमाणे एकूण किं ७५०रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

दिनांक १६/०७/२०२४ रोजी पोस्टे सावनेर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, सावनेर आयटीआय समोरून रोडने एक महिला थैलीमध्ये दारू घेऊन जात आहे. अशा माहितीवरून स्टाफने सदर महिलेच्या हातातील थैलीची पाहणी केली असता थैली मध्ये विदेशी दारू imperial Blue च्या १८० एम एल च्या १२ निपा किंमती १९२०/- रु चा मुद्देमाल विनापरवाना विक्री करता घेऊन जात असताना मिळुन आल्याने महिला आरोपीविरूद्ध कलम ६५ (ई) मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली. पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, आरोपी १) फिरोज शेख, रा. वार्ड क्र. ५, नरखेड यांच्या राहत्या घरी दिलीप रामचंद्र वलके वय ३९ वर्षे नावाचा इसम हा मोहाफुल गावठी दारू बाळगुन विक्री करीत आहे. अशा माहितीवरून आरोपी फिरोज शेख याचे घराची दारूवावत घरझडती घेतली असता ३५ लिटर गावठी मोहाफुल दारु प्रति लिटर ५०/- रु प्रमाणे १७५०/- रु चा मु‌द्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपीताविरूद्ध पोस्टे नरखेड येथे कलम ६५ (ई) मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, सरकारी दवाखाना कन्हानचे वाजूला झाडाजवळ एक इसम अवैधरीत्या दारूची विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून रेड कारवाई करून आरोपी रमेश टिंकू साहानी वय २८ वर्ष रा. वॉर्ड नं.३ कांद्री (फुकट नगर) ता. पारशिवनी याचे ताब्यातून एका प्लास्टीक पिशवीमध्ये १० निपा देशी दारु भिंगरी संत्रा नं. १ च्या प्रत्येकी १० एम. एल. एकुण ९०० एम.एल. देशी दारु प्रत्येकी कि, ३५/- रु. प्रमाणे एकुण कि. ३५०/- रु. चा मुद्देमाल जप्त करून कलम ६५ (ई) मदाका. प्रमाणे कारवाई करण्यात आली.

पोस्टे कन्हान हद्दीत निलज येथील आरोपी राजेश रामदास चकोले, वय ४७ वर्ष रा. निलज वार्ड क्र. २ पोस्ट सालवा ता. पारशिवनी याचे घराची दारूवावत घरझडती घेतली असता एका प्लास्टीक पिशवीमध्ये १८ निषा देशी दारु भिंगरी संत्रा नं. १ च्या प्रत्येकी ९० एम. एल. एकूण १६२० एम.एल. देशी दारु प्रत्येकी कि, ३५/- रु. प्रमाणे एकुण कि. ६३०/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीविरूद्ध कलम ६५ (ई) मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक, वाहनासह एकूण ६,०३४००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Fri Jul 19 , 2024
नागपूर  :- पोस्टे खापा येथील स्टाफ पो. स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असता मौजा दुधवर्डी (गडेगाव शिवार) येथे एक लाल रंगाचा ५७५ डी १ सरपंच महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४०/वी इ- २१६५ व बिना नंबरची लाल रंगाची ट्रॉली चा चालक आरोपी नामे ईश्वर सेवकराम धुर्वे, वय २८ रा. रंगारीपुरा खापा हा आपल्या ताब्यातील ट्राली मध्ये एक ब्रास रेती वाहतूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com