काबूल तुरुंगात बंद असलेल्या केरळच्या निमिषाची कहाणी काय आहे ?

केरळची निमिषा बनली लव्ह जिहादची शिकार, काबूल तुरुंगात आहे प्रेमासाठी धर्म परिवर्तन करून मुस्लिम बनलेली मुलगी अफगाणिस्तानात मानवी बॉम्ब बनण्यासाठी गेली याची तुम्ही कधी कल्पना करू शकता ? तीही शिकलेली असताना तिचा भाऊ भारतीय सैन्यात आहे.

या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट इंडिया टीव्हीवर दाखवण्यात आला, तिची आई संपूर्ण मुलाखतीत अनेक वेळा रडली आणि म्हणाली की माझ्या मुलीने मला थोडीफार तरी कल्पना द्यायला हवी होती, आजकाल मुलींना असे वाटते की त्या खूप हुशार झाल्या आहेत आणि त्यांना सगळं काही समजत म्हणून त्या पालकांपासून सर्वकाही लपवून ठेवतात.

परिणामी केरळमधील निमिषा, जी अतिशय चांगल्या कुटुंबातील होती, ती आज काबूल तुरुंगात आहे.

एक मुस्लिम तरुण तिचा पाठलाग करायचा, एक दिवस त्याच्या घरचे आई वडील निमिषाला भेटले आणि सांगितले की आमच्या मुलाने MBBS केले आहे आणि आता तो डॉक्टर आहे, त्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे, पण अट अशी की तू इस्लाम धर्म स्वीकार, हळूहळू निमिषाचे ब्रेनवॉश करण्यात आले, मग निमिषाने घरातून पळून जाऊन बशीरशी लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारला.

लग्नाच्या चौथ्या दिवशीच निमिषाला समजले की ती ज्याच्यासोबत पळून गेली तो डॉक्टर नसून एक वाया गेलेला लफंगा आहे, त्यानंतर बशीरच्या कुटुंबीयांनी निमिषाला दुसऱ्या मुस्लिमाला विकले म्हणजेच निमिषाचे पुन्हा एका मुस्लिम तरुणाशी लग्न झाले आणि तो मुस्लिम तरुण २४ जणांसह ISIS मध्ये सामील झाला आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्या विरोधात लढायला गेले जिथे त्यांना अमेरिकन सैन्याने एका छाप्यात अटक केली व तेव्हापासून काबूल तुरुंगात बंद आहेत.

NIA ने निमिषाचा फोटो निमिषाच्या आईला दाखवला तेव्हा कळलं की ती निमिषा आहे, एक सुशिक्षित मुलगी, जीचा भाऊ भारतीय सैन्यात आहे आणि तिला स्वतःला डॉक्टर व्हायचं होतं, खोट्या आणि दिखावा करणाऱ्या प्रेमात अडकली, धर्मांतर, घटस्फोट, मानवी बॉम्ब परदेशात पाठवण्यात आल, आणि आज काबूलच्या तुरुंगात सडत आहे.

ही झाली एक कहाणी अशा हजारो कहाण्या आहेत आणि केरळ स्टोरी चित्रपटात तर फक्त तीन मुलींच्या कहाण्या दाखवल्या आहेत.

लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे ज्यात दहशत वादी संघटनेत भरती केले जाते, हे कोर्टाने ही सांगितलं असताना, तामिळनाडू, केरळ, दिली, पंजाब, आणि पश्चिम बंगाल सरकारने चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घातली व सगळे शो रद्द केले. यावर कोणी ही लिब्रांडू बोलणार नाही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यावर ही चकार शब्द काढणार नाहीत. पण जर खानावळी गँग पैकी कुणाचा चित्रपट भाजप शासित राज्यात बॅन केला असता तर लिब्रांडूनी आता कपडे फाडून घेतले असते व संविधान धोक्यात आले म्हणून विदवा विलाप केला असता.

– भूमिका गौतम मेश्राम

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

न्यायालयातून आरोपींना शिक्षा

Fri May 12 , 2023
नागपूर :-दिनांक ११.०५.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश पि.वाय लाडेकर यांनी त्यांचे कोर्टाचे केस के ११९/२०१६ मधील पो. ठाणे हिंगणा येथील अप.क्र. १०८/२०१५ कलम ३०७, ३४ भा.दं.वि. या गुन्हयातील आरोपी २) पांडुरंग उर्फ पांडु मेघराज जाधव वय ३४ वर्ष, २) प्रकाश मेघराज जाधव वय २७ वर्ग दोन्ही रा. मेटा उमरी, हिंगणा, नागपूर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com