स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता. 22) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून मे श्रीनिवासन रियल कुंदन, बजाज नगर रोड, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोन अंतर्गत मे हॅवन बिल्डर्स, उज्वल सोसायटी, नरेन्द्र नगर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धतोली झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गेनक्युर हॉस्पीटल यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव वैद्यकीय कचरा आढळून आल्याने कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.गांधीबाग झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाद्वारे आसीफ शेख, जलालपुरा महाल यांच्यावर ड्रेनेज चेंबरबाबत अडथळा केल्यामुळे कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पेस्ट़्रीज बिल्डर्स, वर्धमान नगर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. हरिओम फुड़़स ॲन्ड बेकरी यांच्यावर स्वछता आढळुन आली नसल्यामुळे कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com