अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध धडक मोहीम

केळवद :- पोस्टे केळवद येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असता यातील आरोपी नामे- मनोज नारायण गुप्ता, वय ५६ वर्ष, रा. मेनरोड मार्केट चौक ता. सावनेर हा गुप्ता दावा उमरी येथे देशी दारू याळगुन विक्री करताना मिळुन आल्याने त्याचे ढाब्याचे झडतीत स्वयंपाक करण्याचे जागेजवळ एका थैलीत प्रत्येकी ९० मिली देशी दारू ने भरलेल्या १० प्लॉस्टीक सीलबंद बॉटल असा एकुण ३५० रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

दि. १४/०७/२०२४ रोजी पोस्टे काटोल येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, लिंगा गावात अवैध दारूची विक्री सुरू आहे. अशी माहिती मिळाल्याने रेड कारवाई करून लिंगा गावातील आरोपी नामे विरेन्द्र पांडुरंग पाटील वय ४५ वर्षे रा. लिंगा ता. काटोल याचे घराची दारूबावत घरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून घराचे बेडरूमध्ये लोखंडी पेटीवर असलेल्या कापडी वाकळमध्ये प्रत्येकी १८० मी.ली क्षमतेच्या देशी दारू संत्रा नं. १ डिलक्स कंपनीच्या १२ निषा प्रत्येकि कि. ७० रू. प्रमाणे एकुण ८४० रू. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका. प्रमाणे कारवाई करण्यात आली.

दि. १४/०७/२०२४ रोजी पोस्टे कोंडाळी येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम मौजा अडेगाव येथे अवैध दारूची विक्री करीत आहे. अशा गोपनीय माहिती वरून नमुद घटनास्थळी सापळा रचुन आरोपी नामे आदेश गुरूदेव पेंदाम वय २३ वर्षे रा. अडेगाव याने जवळ असलेल्या पिशवीची पाहणी केली असता देशी दारूने भरलेल्या १८० एम एल क्षमतेचा ०८ निपा एकुन १४४० एमएल एकुण ५६० रू चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

दि. १४/०७/२०२४ रोजी पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी मारोती मोतीराम बोंद्रे वय ५८ वर्ष रा. लहान पाचगाव वार्ड क्र. ०२ पो. खैरी विजेवाडा, रामटेक हा आपले घरी मोहाफुल गावठी दारू अवैधरीत्या बाळगुन विक्री करीत आहे. अशा खबरेवरून स्टाफचे मदतीने रेड कारवाई करून आरोपीचे पराची परड़झडती घेतली असता १० लीटर प्रमाणे २० लीटर मोहाफुल गावठी दारू प्रत्येकी ५०/- रू लिटर प्रमाणे १०००/- रू. चा मुद्देमाल मिळाला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणारे विधीसंघर्ष बालक पोलीसांचे ताब्यात व घरफोडीतील मुद्देमाल जप्त

Tue Jul 16 , 2024
– बेला पोलीस स्टेशनची कार्यवाही बेला :- दिनांक ११/०३/२०२४ रोजी अपराध कंमाक ९१/२४ कलम ३८०, ४५४, ४५७ भा.द.वि. अन्वये पोलीस स्टेशन बेला येथे दिनांक ०९/०३/२०२४ चे ११.०० वा. ते दिनांक ११/०३/२०२४ चे १०.०० वाजता दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा येथील शाळेतील कोणीतरी अज्ञात चोराने कार्यालयाचे व दोन वर्ग खोल्याचे दाराचे कुलूप तोडुन शाळेमधील दोन वर्ग खोल्यामधील रेकॉर्ड व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com