संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10:- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका ह्या भयमुक्त वातावरणात होऊन कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे या मुख्य उद्देशाने नागपुर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी नुकतेच परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी,जुनी कामठी पोलीस स्टेशन सह जरीपटका,कळमना,यशोधरागर व आदी पोलीस स्टेशन सह एकूण 8 पोलीस स्टेशन च्या 130 च्या जवळपास गुन्हेगारांचा खाकी क्लास घेऊन परेड घेतली व निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने उपस्थित सर्व गुन्हेगारांना तंबी दिली व त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली .यात शहरातील गुन्हेगार, कारागृहातून सुटलेले तसेच मोक्का अंतर्गत रिलीज झालेल्या आरोपी वृत्तीच्या गुन्हेगारांचा समावेश होता.
यावेळी गुन्हेगाराकडून हमी पत्र भरून घेण्यात आले. बेकायदेशीर कृत्य करणार नाही असे केल्यास दंडास पात्र राहील असे हमी पत्रात नमूद आहे.