…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेला दिल्या नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा

मुंबई :- नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रय़त्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर मेट्रो करता मैलाचा दगड; रायडरशिपने २ लाखांचा टप्पा पार केला

Mon Jan 2 , 2023
● रात्री 8 वाजता 2,02,608 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक प्रवासी संख्या नागपूर :- २०२२ मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. आज (१ जानेवारी २०२३ – रविवारी) महा मेट्रो ची रायडरशिपआठ वाजे पर्यंत 2,02,608 इतकी होती. मेट्रो सेवा रात्री संपे पर्यंत हा आकडा वाढणार आहे. या वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com