शालांत परीक्षेत मनपाच्‍या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

– मनपाच्या शाळांचा ८७.५९ टक्के निकाल

– ८ शाळांचा १०० टक्के निकाल, तर 11 शाळा ९० टक्के यांच्यावर

नागपूर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, परीक्षेत नागपूर महानगरपलिकेच्‍या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थांना मिळालेल्‍या यशाबद्दल मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनपाच्या शाळांचा निकाल ८७.५९ टक्के एवढा लागला आहे. यात मराठी माध्यमाचा निकाल ८९.३५ टक्के तर हिंदी माध्यमाचा निकाल ८१.४५ टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल ९८.६१ टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. याशिवाय मनपाच्या ०८ शाळेंचा निकाल शंभर टक्के लागला असून, 11 शाळांचा निकाल ९० टक्केच्या वर, तर ०६ शाळांचा ७५ ते९० टक्के दरम्यान निकाल लागला आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मनपाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी अभिनंदन केले आहे.

मनपाच्या मराठी माध्यमातून अथर्व सुधीर गयनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर हिंदी माध्यमातून आर्यन शाह याने ८४.६० टक्के गुण मिळावीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. उर्दू मध्यामातून शीफा परवीन मो. नाजीर अहमद हिने ८६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून जारीया सय्यद अजय आली सय्यद हिने ८७.६० हिने गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांमधून धनश्री निळकंठ वट्टी हिने ८३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर अथर्व सुधीर गायनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मनपा माध्यमनिहाय प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी

*मराठी माध्यम

अथर्व सुधीर गयनेवार -दुर्गा नगर माध्य. शाळा

श्वेता श्रीकृष्ण कोरे- जयताळा माध्य. शाळा

संपदा अरविंद खांडेकर- जयताळा माध्य. शाळा

*हिंदी माध्यम*

आर्यन दिपक शाह – पन्नालाल देवडीया माध्य. शाळा

प्रवीण विजय वर्मा – संजयनगर माध्य. शाळा

रविना रामकुमार सेलोकर -संजयनगर माध्य. शाळा

निशा अमीरका पासवान -लाल बहादुर शास्त्री माध्य. शाळा

*उर्दू माध्यम*

शीफा परवीन मो. नाजीर अहमद- गरीब नवाज माध्य. शाळा

बुशरा बानो मो. अनीस -एम.ए.के. आझाद माध्य. शाळा

झहेदा खातुन मुजीबुल्लाह सिद्दीकी-ताजाबाद माध्य. शाळा

*इंग्रजी माध्यम*

जारीया सय्यद अजय अली सय्यद- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा

शिझा शफीक शाहीद खान- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा

मुग्धा धीरज गजभिये- जी. एम. बनातवाला माध्य. शाळा

*दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम*

धनश्री निलकंठ वट्टी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्य. शाळा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम

अथर्व सुधीर गयनेवार -दुर्गा नगर माध्य. शाळा

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पदवीधर,शिक्षक निवडणूक मतदार ‍नोंदणीसाठी अंतीम मुदत

Tue May 28 , 2024
नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 28 मे 2024 असून हे अर्ज पदनिदर्शत ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्विकारले जातील अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com