नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामनगर चौक, शिवाजी नगर येथील 5 मजली सिताराम भवनस्थित नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पाहणी करुन सदिच्छा भेट दिली. या संस्थेच्या राज्यात एकूण 38 शाखा आहेत. राज्यासह इतर राज्यात सुध्दा शाखा आहे. धरमपेठची ख्याती अशीच वाढत राहो,अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.या सोसायटीच्या इमारतीचे लोकापर्ण सायंकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा निलीमा बावणे, उपाध्यक्ष सारिका पेंडसे, डॉ. परिणय फुके उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांची नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीला सदिच्छा भेट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com