कन्हान :- पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असता गुण बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, मौजा कामठी कडुन दोन इसम एका पांढच्या रंगाचा मॅस्ट्रो मोपेड वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंत्रीत तंवाखुची वाहतुक करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्टाफ यांनी मौजा जुने पोलीस स्टेशन कन्हान चे बाजूला दि. २२/११/२०२४ चे १४.०० वा. ते १४.४५ वा. दरम्यान नाकाबंदी केली असता पांढ-या रंगाचा मॅस्ट्रो मोपेड वाहन क MH-40 AJ-0446 ही येताना दिसल्याने सदर वाहनास स्टाफच्या मदतीने धांवण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने आपले वाहन रोडच्या कडेला थांबवले असता सदर वाहन चालक यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव जकारू लतीफ शेख, वय ३९ वर्ष रा. शिवनगर कन्हान ता. पारशिवनी असे सांगीतले व त्याचे सोवत असलेल्या ईसम त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव २) विवेक मेश्राम वय ३६ वर्ष रा. इंदिरा नगर कन्हान असे सांगीतले, त्यांचे वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत सुगंधीत तंगाखु मिळून आला तो खालिलप्रमाणे कापड़ी थैलीमध्ये २४ नग बागवान ४७ कंपनीचे प्रतीबंधीत सुंगधीत तंबाखुचे टिनाचे डवे प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी ७२५/- एकुण १७४००/-रू असा एकुण ८७४००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूद्ध पोस्टे कन्हान येथे कलम २७४, २७५, २२३, ३(५) वि. एन एस सहकलम २६(२)(ii),२६(२) (iv),२७ (२) (e), ३० (२) (a) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.