उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागेपल्लीतील लाडक्या बहिणींशी संवाद

गडचिरोली :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील नागेपल्ली या गावात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले का, याबाबत आस्थेने विचारपूस केली आणि सदर पैसे हे महिलांनी त्यांच्या स्वतःसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या.

अर्ज कधी भरला, आधार कार्ड आहे का, बँक खाते काढले का, योजनेबाबत तक्रार आहे का आदी प्रश्न विचारून ज्या महिलांनी अद्याप पर्यंत अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांनी काळजी करू नये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना निश्चितच मिळेल याबाबत आश्वस्त केले.

यावेळी एका मुकबधीर महिलेने आपल्या अडचणी मांडल्या असता उपमुख्यमंत्री पवार यांनी तातडीने तहसीलदार यांना बोलवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री यांना महिलांनी राखी बांधून त्यांचे स्वागत केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मलजलवाहिनी आणि जलवाहिन्यांचा मास्टर प्लॉन अद्ययावत करा

Sun Sep 8 , 2024
– ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश  – विविध समस्यांचा घेतला आढावा नागपूर :- नागपूर शहराचा होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यादृष्टीने शहरातील मलजलवाहिनी तसेच जलवाहिन्यांचा तयार असलेला मास्टर प्लॉन अद्ययावत करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com