जिवानीशी ठार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस स्टेशन उमरेड अप. क्र. २५०/२४ फलम ३०२ भादंवी गुन्हयाचे समांतर तपास कामी उमरेड, नागपूर हद्दीत आरोपी शोधकामी फिरत असता मृतकचे नातेवाईक, व आरोपीचे नातेवाईक यांचेकडून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे महादेव उर्फ जग्गू रतन जाधव वय ३० वर्ष, रा. जुनोनी त. उमरेड जि. नागपूर हा आपले नातेवाईक सासू सुनिता चव्हाण राहणार गंगापूर तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे पळून गेल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी त्याचे नातेवाईकाकडे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की दिनांक ०८/६/२०२४ रोजी मी माझा मित्र मृतक नामे- नितेश कवडू जाधव व माझ्याकडे कामावर असलेला फरार आरोपी राजेश उर्फ राजा शामरावजी भोयर वय ३० वर्ष, रा. गावसुत तालुका उमरेड जिल्हा नागपूर आम्ही तिचेही मिळून दिवसभर दारू पिलो व सायंकाळी ८/०० ते ८/३० वा. मोहपा रोडनी आपले गावी माझे मोटरसायकल क्र. MH 40 CL 4345 नी जात असता मृतक याने माझे कडे काम करणारे राजेश उर्फ राजा यास गाला गालावर मारणे सुरू केले त्यामुळे माझे नोकराने मला गाडी थांवण्यास सांगितले असता मी बीपीएड कॉलेज उमरेड चे जवळ थांबलो असता मृतक याने मला सुद्धा धक्का देऊन जमिनीवर पाडले असता आम्हाला राग आला व चिडून जाऊन आम्ही दोघांनी मिळून मृतक यास मारहाण करून खाली पाडले व गोट्याने मारले मृतक खाली पडल्यानंतर त्याचे डोक्यावर जवळ पडला असलेला मोठा दगड त्याचे चेहऱ्यावर टाकला व त्यास जीवानिशी मारून आम्ही तिथून निघून गेलो.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीस २४ तासाचे आत ताब्यात घेतले व गुन्हयाच्या पुढील अन्वेषण कामी पोलीस स्टेशन उमरेडचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, ब‌टुलाल पांडे, पोहवा अरविंद भगत, पोहवा गजेंद्र चौधरी, पोहवा रंजीत जाभव, पोहवा मयूर देकले पोशी राकेश तालेवार, चापोशी आशुतोष लांजेवार, चापोशी सुमित बांगडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

Tue Jun 11 , 2024
मौदा :-  पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा कडुन नागपूर च्या दिशेने NH-53 महामार्गाने ट्रक क्र. MH-31/DS-7786 तसेच महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-49/AT-6054 मधून अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने नमूद दोन्ही वाहनांना नाकाबंदी करून मौजा मारोडी शिवारात पकडून पाहणी केली असता ट्रक क्र. MH-31/DS-7786 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com