मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठीत करणार

– नागपुरात 100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

– सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले चित्रसृष्टीसाठी धाडसी निर्णय

मुंबई :- चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची समिती गठीत करुन या कामास गती देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.

नागपूर साठी गुड न्यूज!

विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

तसेच अनुदानाास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, “क” या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठीत करण्याच्या सूचनाही मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोनझारी आदिवासी मोहल्यात तान्हा पोळा साजरा

Thu Sep 5 , 2024
नागपूर :- सोनझारी आदिवासी मोहल्ला प्रभाग क्रमांक ३० येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, शिवसेना माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार, नगरसेवीका मुळे, ज्योती देवघरे, कुंनदेलवार, कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाजाचे महागुरू अर्जुन बेहरे, अध्यक्ष रमेश बेहरे, कोषाध्यक्ष अशोक पत्रे, आदिवासी समाजाचे जेष्ठ आत्माराम पत्रे, प्रविण विघरे, संग्राम भीमारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com