रेडिओ विंगच्या अधिवेशनासाठी उर्दू विंग पाठिशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे मुफ्ती हारून नदवी यांची जळगाव कार्यालयाला भेट

जळगाव खानदेश :-  देशाच्या इतिहासात प्रथमच रेडिओतील पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिक येथे होत आहे. रविवार, ११ जून २०२३ रोजी होऊ घातलेल्या या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनाच्या तयारीला शुभेच्छा देण्यासाठी उर्दू विंगच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव खानदेश येथील कार्यालयाला भेट दिली.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या उर्दू विंगचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांनी रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख यांची भेट घेत त्यांना अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव खानदेश जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जनवाला, प्रसिद्धी प्रमुख स्वामी पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांची एकजूट झाली आहे. रेडिओ विंगचे अधिवेशन प्रथमच होत आहे. त्यासाठी रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नदवी यांनी शुभेच्छा दिल्या. व्हॉईस ऑफ मीडियाचे अधिवेशन मोठ्या प्रमाणावर व्हावे आणि त्यातून रेडिओ माध्यमातील पत्रकारांच्या समस्यांवर तोडगा निघो, असे नदवी यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले. देशात व्हॉईस ऑफ मीडियाच्या रेडिओ विंगचे काम जोमाने सुरू असल्याबद्दलही त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला.

आजपर्यंत रेडिओ माध्यमातील पत्रकारांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. उर्दू माध्यमातील पत्रकारांकडेही कुणी लक्ष दिले नव्हते. परंतु व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून देशभरातील विविध भाषा, प्रांत, राज्य आणि वेगवेगळ्या माध्यमातील पत्रकारांचे प्रश्न सुटत असल्याबद्दल नदवी यांनी समाधान व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे नमूद करीत नदवी म्हणाले की, रेडिओ विंगच्या सर्व पत्रकारांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. रेडिओ, डिजिटल आणि ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकारांना श्रमिक दर्जा मिळवून देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाची मोठी भूमिका राहिली आहे. यासाठी काळे व त्यांच्या टीमने केलेले प्रयत्न अतुलनिय असल्याचेही नदवी यांनी अभिमानाने नमूद केले.

लढ्याला सुरुवात

रेडिओ माध्यमातील पत्रकारांसाठी असलेल्या न्याय लढ्याला आता सुरुवात झाली आहे. नाशिक येथे होणऱ्या अधिवेशनातून रेडिओ पत्रकारितेच्या क्षेत्रात निश्चितच नवा इतिहास लिहिला जाणार आहे, यात दुमत नाही.

– अमोल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष रेडिओ विंग

व्हॉईस ऑफ मीडिया

विचारमंथनातून बळ मिळेल

पत्रकारांसाठी असलेला लढा व्यापक आहे. त्यात प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. रेडिओ विंगच्या अधिवेशनामुळे या क्षेत्रातील पत्रकारांना वेगळे बळ नक्कीच मिळेल. हे केवळ अधिवेशन नाही तर विचारमंथनाचे केंद्र ठरणार आहे.

– अनिल म्हस्के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

व्हॉईस ऑफ मीडिया

NewsToday24x7

Next Post

रणाळ्यात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Fri Jun 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅन ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ रामटेके वय 30 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व त्याची बहिण घरी असता सदर मृतक […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com