– सीटूच्या आशा व गटप्रवर्तकांचा संविधान चौकात धरणा आंदोलन सुरूच
नागपुर :-आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) नागपूर जिल्हा तर्फे संविधान चौकात आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी ३ ऑक्टोंबर रोजी तीव्र आंदोलन करून सरकारवर रोष व्यक्त केला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस कामाचा दबाब वाढविण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक कृती समितीचे निर्णयानुसार १८ तारखेपासून बेमुदत संपाची घोषणा केली. त्या अनुसार महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपात सहभागी झाल्या आहेत. नागपूरात CITU तर्फे संविधान चौकात शेकडो आशा व गटप्रवर्तक यांनी धरणे आंदोलन केले परंतु मागण्या मान्य नाहीच ! त्यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.राजेंद्र साठे, कॉ.प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर यांनी केले.
आंदोलनात शेकडो आशा वर्कर व सुपरवायझर उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून व निदर्शनातून कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला. आशांच्या मागण्या ऑक्टोबर पर्यंत मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील आशा वर्कर व सुपरवायझर मागण्या मान्य होईपर्यंत संपावर राहतीलच अशी घोषणा सीटू तर्फे करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिस्ट मंडळ मां.अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांना भेटून आरोग्यमंत्री व आरोग्य संचालक यांच्या नावे निवेदन सादर केले. परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळे आम्हाला संपात जावे लागले असे कॉ.राजेंद्र साठे यांनी आपल्या भाषणात सांगितले. धरणे आंदोलनात प्रामुख्याने राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, रूपलता बोंबले, लक्ष्मी कोत्तेजवार, कांचन बोरकर, पिंकी सवाईथूल, आरती चांभारे, माया कावळे, अर्चना कोल्हे, रेखा पानतावणे, सरला मस्के, कोमेश्वरी गणवीर, कुंदा भिवगडे, वनिता कोटांगले, सारीका लांजेवार, छाया दोडके, ऊषा ठाकरे, मासुरकर, दमयंती सलामे, मोनिका गेडाम, सफाई कर्मचारी रमेश पानुरकर, अस्मिता सोमाकुवर, केजराम नागपूरे सहीत शेकडोंच्या वरून आंदोलनात कर्मचारी उपस्थित होते.
मागण्या :
१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.
२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
३) आशा -सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.
४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.
५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.
६) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसरच्या सहीने देण्यात यावा.
७) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.
८) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.
९) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.
१०) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रू. रोज देण्यात यावा.