संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुतळा परिसर समोर व परिसरात फुटपाथ फेरीवाले नियोजित षड्यंत्रानुसार अतिक्रमण करून बसतात .या परिसरात विभत्स स्वरूपाचे झालेले हे अतिक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणात अडचणीचे ठरत आहे.व शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याचे रक्षण व देखरेख बाबत प्रशासन यंत्रणेकडून होत असलेली उदासीनता व निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येत आहे. तेव्हा हे अतिक्रमण काढुन परिसर स्वच्छ व मोकळा करून परिसर अतिक्रमणकारांसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कामठीच्या वतीने नागपूर जिल्हा संघटन प्रमुख राधेश्याम हटवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर ला दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना कामठी शहर प्रमुख मुकेश यादव, कामगार संगठन मोहन मनोहर अरगुटले, सुंदर सिंह रावत, सुनील काटगाय, चौधरी निहाल सिंह, मुन्ना प्रजापति, रमेश बाबू बैद, शंकर ताल वाले, प्रशांत खोबरागड़े, राकेश आदी शिवसैनिक उपस्थित होते.