यवतमाळ :- कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे शेतीसाठी ड्रोनचा वापर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुरेश नेमाडे कार्यशाळेच्या अक्ष्यक्षस्थानी होते.
कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी. पार्लावार, सहयोगी अधिष्ठाता डॉ.विजय माने, सहयोगी संशोधन संचालक डॉ.प्रमोद यादगीरवार, प्रभारी अधिकारी डॉ.अशितोष लाटकर, जिल्हा व्यवस्थापक संतोष फलटणकर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादन गटाचे प्रतिनिधी, माविमचे अधिकारी, प्रगतशील शेतकरी, शेती उद्योजक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ.सुरेश नेमाडे यांनी शेतीसाठी ड्रोनचा वापर या विषयी महत्त्व विषद केले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणीचा व्यवसाय करणारे युवा उद्योजक व मामा ड्रोनचे संचालक धीरज बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषि अभियांत्रिकीचे विषयतज्ञ राहुल चव्हाण यांनी ड्रोनचा शेतीसाठी वापर, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ.प्रशांत काळे यांनी शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर, विषयतज्ञ डॉ.प्रमोद मगर यांनी ड्रोनद्वारे शेतीमध्ये फवारणी पद्धत व वापर, जिल्हा व्यवस्थापक संतोष फलटणकर यांनी नँनो खतांचा ड्रोनद्वारे वापर, तंत्र अधिकारी अनिल राठी यांनी ड्रोनसाठी शासकीय अनुदान, धीरज बोर्डे यांनी ड्रोन व्यवसाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित शेतकरी बांधवाना प्रत्यक्षात ड्रोनद्वारे शेतीवर फवारणीचे प्रात्यक्षिक संगणक सहायक राधेश्याम देशमुख यांच्याद्वारे देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विषयतज्ञ राहुल चव्हाण, यांनी केले तर विषयतज्ञ मयूर ढोले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषयतज्ञ डॉ.गणेश काळूसे, विशाल राठोड, लखन गायकवाड, प्रतिक रामटेके, किशोर शिरसाट, शिवानी बावनकर, प्राची नागोसे, रवींद्र राठोड, नयन ठाकरे इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.