केळवद :- अंतर्गत मौजा खुरजगाव शिवार येथे दिनांक २१/०७/२३ से २१/०० वा दरम्यान, यातील मृतक नामे शुभम रामेश्वर धुर्वे वय २६ वर्ष रा. खुरजगाव ता. सावनेर हा घरून संडास करण्याकरीता गावाजवळ असलेल्या रेल्वे पटरीकडे गेला असता, त्याला रेल्वेची धडक बसल्याने त्याचे डोक्याला पायाला व शरीरावर इतर ठिकाणी जबर मार लागल्याने शुभम धुर्वे हा जागीच मरण पावला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे ईश्वर जानराव धुर्वे वय ३० वर्ष रा. खुरजगाव यांचे रिपोर्टवरून पोस्टे केळवद येथे कलम १७४ जाफौ ची नोंद करण्यात आली. सदर मर्ग या पुढील तपास पो हवा / सूधिर पोस्टे केळवद हे करीत आहे