संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी विवाहितेचा गळफासने मृत्यु झाल्याची घटना काल रात्री साडे नऊ वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव सलमा मोहम्मद परवेज वय 22 वर्षे रा वारीसुपुरा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेला पती व एक वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. सदर मृतक महिला ही खाली पडल्याने मृत्यू झाला अशी माहिती मृतकेच्या पतिने शिवणी येथे असलेंल्या सासरी मंडळीला दिली असता सासरी मंडळी मृतकेच्या घरी पोहोचले असता तिच्या गळयावर गळफास चे निशाण दिसून आले त्यावर संशय व्यक्त करीत या मृत्यू प्रकरणात घातपाताची शंका व्यक्त करीत पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली यावर पोलिसांनी सदर घटनेची नोंद करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास मर्ग दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे गूढ रहस्य उलगडणार हे इथं विशेष!