हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मध्ये शेजारी राहणाऱ्या आरोपीने शेजारी वादातून पीडित फिर्यादी डेझी जयेंद्र हिरणवार वय 32 वर्ष यांच्या घरासमोर उभे राहून हातात धारदार शस्त्र घेत अश्लील शिवीगाळ देत फिर्यादीच्या पतीसह फिर्यादीचे भाचा व नणंद ला जीवे मारण्याची धमकी देत घरासमोर उभे असलेल्या चार चाकी वाहनावर हातातील धारदार तलवारीने मारून वाहनाचे नुकसान करीत घरासमोर दहशत माजविल्यची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादीने स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरज देवराव गोमेकर वय 40 वर्ष राहणार ऑरेंज सिटी पार्क कामठी विरुद्ध भादवी कलम 506(2),504,भारतीय हत्यार बंदी कायदा 4/25अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केले.

पोलिसांनी दिलेल्या महोतीनुसार फिर्यादी व आरोपी हे एकाच वस्तीत राहणारे असून आरोपीने काल दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 22 :30 वाजता चे दरम्यान हातामध्ये तलवार घेऊन फिर्यादीचे घरासमोर येऊन फिर्यादीचे पतीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीची मालकी हक्काची असलेली फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच 31 5005 हिचे बोनेटवर देखील तलवारीने मारून नुकसान केले .असे फिर्यादीचे रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध कलम 506 ब; 504 ;427 भादवी सह कलम 4;25 शस्त्र अधिनियम सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केले. आरोपीचे घरातून एक तलवार कोयत्या सारखी दिसणारी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com