‘महाज्योती’च्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट-2025 पूर्व प्रशिक्षण अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

– राज्यभरातील विद्यार्थ्यांना देणार ऑनलाईन प्रशिक्षण

– पात्र विद्यार्थ्यांना मिळाणार टॅब संस्था पुरवणार

नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विषेश म्हणजे, या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला 6 जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी, जेईई, नीट 2025 करिता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. यात राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल. इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असावा. उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते अर्ज करण्यास पात्र राहतील. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) आणि दहावी ची गुणपत्रिकेसह अन्य आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे अपेक्षित आहे, असेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

 विद्यार्थ्यांना असा करता येणार अर्ज

महाज्योतीच्या संकेतस्थळावर सूचना फलक (नोटीस बोर्ड) या पर्यायात जाऊन ‘ॲप्लिकेशन फाॅर एमएचटी-सीईटी/जेईई/नीट 2025 ट्रेनिंग’ ला भेट द्यायची आहे. यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा अर्ज हा स्वीकृत होणार, अशी माहिती महाज्योतीतर्फे देण्यात आली.

 विद्यार्थ्यांना टॅबसह 6 जीबी इंटरनेट डाटा मिळणार

महाज्योतीमार्फत एमएचटी-सीईटी, जेईई, नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला 6 जीबी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.

 अर्जदारांना काॅल सेंटरद्वारे मार्गदर्शन

अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे काॅल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 0712-2870120/21 या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट24@जिमेल.काॅम वर आपल्या अर्जातील साषंकता दुरू करता येणार. विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज भरता येणार. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही महाज्योतीकडून सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रत्येक कामगाराची मतदार नोंदणी कारखाना मालकाची जबाबदारी - जिल्हाधिकारी

Sun Aug 20 , 2023
Ø कामगारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी विशेष अभियान नागपूर :- नागपूर हे वाढते औद्योगिक शहर असून येथील औद्योगिक वसाहतीत सुमारे 40 ते 50 हजार कामगार रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. हे कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिल्या. निवडणूक विभागाद्वारे मतदार नोंदणीसाठी ‘मिशन युवा इन’ व ‘मतदार यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com