नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य कार्यालयात शनिवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान दिना’चा ७४वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त ‘नामप्रविप्रा’चे अपर आयुक्त अविनाश कातडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान प्रस्तावनेेेचे वाचन करण्यात आले. यावेळी ‘नामप्रविप्रा’च्या अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी अनिल कुमार पातोडे, आस्थापना अधिकारी विजय पाटील, वसुली अधिकारी पेठे आणि सहायक आस्थापना अधिकारी डे तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नासुप्र येथे संविधान प्रस्तावनेचे वाचन करून संविधान दिवस साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com