संविधान दिन: राज्यपालांकडून राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई :- भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज (रवि.२६) राजभवन येथे राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांसह राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.

भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतीवर्धित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor, CM, Dy CM pay tribute to police martyrs on 26 /11 anniversary

Sun Nov 26 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis placed wreaths at the Police Martyrs’ Memorial in the premises of the Mumbai Police Commissionerate on the occasion of the 15th anniversary of the martyrdom of police officers and jawans during the Mumbai terrorist attack on Sunday (26th Nov). A Police platoon presented […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!