संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15 :- कामठी तालुक्यात मागील पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.तालुक्यातील नदी, नाल्या,ओढ्याना पूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता कामठी तालुक्यातील केम गावातील गणेश बन्सीराम देऊळकर यांच्या घराची भिंत कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत नुकसानग्रस्त गणेश देऊळकर यांनी शेजारी असलेल्या घरात कुटुंबासह आसरा घेतल्याने आज घराची भिंत कोसळल्याच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.
महसूल प्रशासनाने मोक्का तपासणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करीत तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गणेश देऊळकर तसेच केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी केले आहे.
Next Post
शेतकऱ्यांच्या अन्नधान्यावरील प्रस्तावित जीएसटी रद्द करा--हुकूमचंद आमधरे
Fri Jul 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 15 :- शेतकऱ्यांच्या अन्नधान्यवरील प्रस्तावित जीएसटी रद्द करावी अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी कॉन्सिलने अन्नधान्य व खाद्यपदार्थवर (नॉन ब्यांडेड)05 टक्के जीएसटी कर आकारला आहे.सरकारने हा निर्णय रद्द करावा.भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक स्तरावरील विविध घटकांचा […]

You May Like
-
February 20, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली
-
July 10, 2022
बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
-
May 16, 2023
साखळी, आमरण उपोषणानंतर आत्मदहन
-
January 3, 2022
भिमा कोरेगाव शौर्य स्तंभाला सलामी