उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त.

नागपूर – विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.

जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

समृद्धि महामार्ग पर भीषण सड़क हादसा, बस सवार 25 लोगों की हुई मौत.

Sat Jul 1 , 2023
नागपुर – महाराष्ट्र के बुलढाणा जिले में देर रात करीब 2 बजे दर्दनाक हादसा हो गया. बुलढाणा में समृद्धि महामार्ग एक्सप्रेस-वे पर एसी बस पलट गई, जिसके बाद उसमें आग लग गई. इस हादसे में 26 यात्रियों की मौत हो गई है. हादसे के वक्त बस में 32 लोग सवार थे, जबकि 6 लोग गंभीर रूप से घायल हो गए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com