मोदी- शाह विदर्भात, 10 रोजी रामटेक, 14 रोजी चंद्रपुरात सभा

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 10 एप्रिलला नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत.

त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे, तर शाह यांची 5 किंवा 6 एप्रिल रोजी विदर्भात पहिली सभा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अन्य शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी दिली.

प्रचाराची आखणी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होते आहे याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुकीतील प्रत्येक खर्चाची नोंद आवश्यक - खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल

Wed Apr 3 , 2024
गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिच्या पार्श्वभुमीवर उमेदवार व राजकीय पक्ष यांनी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत व नियमानुसार खर्च करणे आवश्यक असून निवडणुकीदरम्यान केलेल्या प्रत्येक खर्चाची व्यवस्थीत व सुयोग्य नोंद ठेवण्याच्या सूचना निवडणुक खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल यांनी आज दिल्या. एस.वेणू गोपाल यांनी आज निवडणूक निरीक्षक कार्यालयात उमेदवारांच्या निवडणुक खर्च लेख्यांचे निरीक्षण केले. यावेळी निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी तथा कॅफो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights