पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– रस्ते विकास कामांचा घेतला आढावा

– जिल्ह्यातील रस्त्यांच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश

नागपूर :- पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ,राष्ट्रीय महामार्ग आणि विविध योजनांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आज आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिना यांनी यावेळी जिल्ह्यातील रस्त्यांच्या काम विषयी सादरीकरण केले. पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागातील रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा. या कामांसाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व या गावांमध्ये दळणवळणाच्या सेवा पूर्ववत होतील यादृष्टीने कामे करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.

जिल्ह्यामध्ये ‘मिनरल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ अंतर्गत येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कामांसाठी आवश्यक जमीन अधिग्रहनाची कामे पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश श्री फडणवीस यांनी यावेळी दिले. या प्रकल्पांतर्गत नवेगाव मोरे ,हैदरी, आलापल्ली बायपास, वडाळा पेठ, येलची आदी रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत.

राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यातील एकूण ५५२ किमी ची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये आलापल्ली -भामरागड- लाहेरी आदी संवेदनशील भागातील रस्त्यांनी जवळपास ११२ कि.मी.च्या रस्त्यांची कामे तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी फडणवीस यांनी दिल्या. या कामांना आवश्यक मंजुरी घेण्यासाठी राज्य शासनाच्या वर्ष २०१७ मध्ये निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय पुढील टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाची ११७ कि.मी. च्या ५ कामांची माहितीही यावेळी देण्यात आली.

बिरसा मुंडा योजनेतून जिल्ह्यातील वाड्या, पाडे मुख्य गावांना जोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २१३ कि.मी. रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव दुरुस्त करून शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ८६०.४८ कि.मी. पैकी ५९८ कि.मी. रस्त्यांची कामे झाली आहेत. या टप्प्यातील उर्वरित कामे तसेच टप्पा -२ अंतर्गत प्रस्तावित १६६ कि.मी. रस्त्यांच्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील रस्त्यांच्या ज्या कामांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घ्यावयाची आहे अशा कामांचा आपण स्वतः पाठपुरावा करून हे विषय मार्गी लावू असेही फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुसऱ्या युद्धात मारल्या गेलेल्या ज्यू बांधवांसाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन

Tue Jan 30 , 2024
– आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे: राज्यपाल रमेश बैस मुंबई :- पारशी समाजाप्रमाणेच आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे आहे. मुंबईचा इतिहास व येथील सुंदर वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. या समाजातील उद्यमशील व दानशूर लोकांनी मुंबई, पुणे व इतरत्र निर्माण केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व तंत्रशिक्षण संस्था आज देखील समाजातील सर्व सामाजिक – आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com