कामठी फार्मसी महाविद्यालयास एनबीए चे रिॲक्रेडीएशन

संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित कीशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी, नागपुर या महाविद्यालयास नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडीएशन (एनबीए) कडून शै. वर्ष २०२५ पर्यंत  रिॲक्रेडीएशन मान्यता देण्यात आली. महाविद्यालय नॅक ‘अ’ दर्जा तसेच मागील ६ वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर एनआयआरएफ रॅंकिंग प्राप्त असून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात एकमेव फार्मसी महाविद्यालय ठरले आहे.

मध्य भारतातील औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रात अग्रगण्य असलेले किशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी कामठी हे महाविद्यालय शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्याकरीता एक नामांकित संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. महाविद्यालयास २५ वर्षे पूर्ण झालेली असून शैक्षणिक दर्जा आणि गुणात्मक दृष्टीकोनातून एनबीए दर्जा निरंतर करीता ५ ऑगस्ट २०२२ ला एनबीए च्या तपासणी पथकांनी महाविद्यालयाची पाहणी करून एनबीए रिॲक्रेडीएशन मान्यता २०२५ पर्यंत प्रदान केली.

महाविद्यालयात उपलब्ध आधुनिक शिक्षण, संशोधन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, रोजगाराच्या संधी इत्यादी घटकांच्या आधारे आज कामठी फार्मसी महाविद्यालय हे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात एकमेव दर्जाप्राप्त फार्मसी महाविद्यालय म्हणून ठरले आहे.

महाविद्यालयास प्राप्त या शिखर यशाकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे रॅंकिंग आणि एनबीए चे संयोजक डॉ. जयश्री ताकसांडे यांचे विशेष आभार व्यक्त केले.

महाविद्यालयाची प्रगती, संशोधन व रोजगाराच्या संधी यामुळे महाविद्यालय अव्वल असल्याचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांनी यावेळी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com