मतदार दिनी प्रमाणपत्राद्वारे होणार सन्मानित
चंद्रपूर – २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांत रांगोळी, वादविवाद इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सरदार पटेल महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, जनता महाविद्यालय,एफ.ई.एस गर्ल्स महाविद्यालय,राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज,साई पॉलीटेक्नीक,खत्री महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्नीक, शासकीय आय.टी.आय इत्यादी महाविद्यालयांत विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने या मतदार जनजागृती करण्यास या स्पर्धा घेण्यात आल्या.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासुन संपूर्ण देशभारत राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नावे नोंदणी करून घेणे हा आहे. देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांना निवडणुक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणुन त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो.
मतदार दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे या महाविद्यालयांनी स्पर्धेद्वारे मतदार जनजागृती करावी म्हणुन प्रोत्साहीत करण्यात येत आहे. शासकीय आय.टी.आय द्वारे रांगोळी, वकृत्व, निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे १.भाग्यश्री वैद्य,२.सीनब सैय्यद ३.श्रुतिका देवगडे विजेते ठरले आहेत तर वकृत्व स्पर्धेत १. छाया गायकवाड २. संदेश बेसेकर ३. मयुरी पाझारे,निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार- बालचंद्र कांबळे,द्वितीय पुरस्कार- रिषिकेश पाटील,तृतीय पुरस्कार – संदेश झाडे विजेते ठरले असुन या सर्वांना मतदार दिनी प्रमाणपत्राद्वारे सन्मानित केले जाणार आहे.