अभीधम्म हा मनाचा सूक्ष्मतम अभ्यास आहे : प्रो डॉ तलत प्रवीण, पुणे विद्यापीठ

नागपूर :-अभीधम्माच्या अभ्यासाने मनाचे सर्व विकार नष्ट केल्या जाऊ शकतात. चिंता, तणाव मनाला लागलेले रोग आहेत. बुद्ध होणे म्हणजेच मनाला सर्व क्लेशातून मुक्त करणे होय. जो चिंतन करतो ते चित्त आहे. जो आलंबनाला जाणतो ते चित्त आहे. अभी धम्मामध्ये चित्ताचा वैज्ञानिक अभ्यास केल्या जातो. अभीधम्मात चित्त, चेतसिक, रूप, आणि निर्वाण असे चार परमार्थ आहेत, अभीधम्म हा मनाचा सुक्षत्तम अभ्यास आहे असे विचार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाच्या विभाग प्रमुख प्रो डॉ तलत प्रवीण यांनी व्यक्त केले.

डॉ तलत प्रवीण ह्या नागपूर विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत अभीधम्मथसंगहो या विषयावर त्या प्रमुख व्याख्याता म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यशाळेचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी आहेत. उद्या सुद्धा याच विषयावर 11.30 ते 4 या दरम्यान आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या महापंडित राहुल सांस्कृत्यायन सभागृहात त्यांचे व्याख्यान सुरू आहे. अशी माहिती पालीचे अभ्यासक व विद्यार्थी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com