मुसळधार पावसातही सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कौतुकास्पद कामगिरी

नागपूर :- शनिवार (दि. 20 जुलै) रोजी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी साचल्यने वीजपुरवठ्यास अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातच अनेक भागात महावितरणची उपकेंद्रे, रोहीत्र, वितरण पेट्या आणि इतर यंत्रणा पाण्यात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन वीजपुरवठा बंद करण्यात आला, दुपारनंतर पावसाचा जोर कमी होऊन पाण्याची पातळी कमी होऊ लागताच महावितरण कर्मचा-यांनी पाण्यात उतरून अनेक भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला. मुसळधार पावसातही महावितरनने वीजपुरवठा सुरळित केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

नागपूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शनिवारच्या मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली, त्यात पहाटेच्य सुमारास पावसाने चंगलाच जोर धरीत तब्बल 6 तासापेक्षा अधिक वेळ सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला. या पावसामुळे नदी, नाल्यांलगतच्या भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली, रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते, हे पाणी अनेकांचा घरांत देखील शिरले, यात महावितरणच्या सुतगिरणी, एम्प्रेस सिटी, बेसा, खापरी, ताजबाग, म्हाळगीनगर, व्यंकटेश्नगर, उप्प्लवाडी, कळमना, बेलतारोडी, पिपळा येथील उपकेंद्रांमध्ये पाणि शिरल्याने या उपकेंद्रातीन होत असलेल्या वाहिन्यांचा चीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणुन बंद करण्यात आला होते, हळूहळू पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

महावितरण कर्मचा-यांनी अनेक ठिकाणी भर पावसात जीवाची बाजी लावित वीजपुरवठा सुरळित राखण्यात यश मिळविले. मुसळधार पावसामुळे गांधीबाग होलसेल मार्केट, नंगा पुतळा, गांधीबाग उद्यान, कमाल चौक, वैशालीनगर, गुरुनानक्पुरा, स्मतानगर, एसआरए, म्हाडा वसाहत, पाचपावली, नवा नकाशा, क्लर्क टाउन, संत्रा मार्केट, रतन प्लाझा, शताब्दी चौक, मरनगर औद्योगिक परिसर, बुटीबोरी या भागात सर्वत्र पाणि साचल्याने तेथील वीजपुरवठा देखील बंद करण्यात आला होता. रचना मिथिला या घरगुती वसाहतीच्या दोन्ही रोहीत्राच्या वितरण पेट्या पोहरा नदीच्या पाण्याखाली गेल्याने तेथील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता, याशिवाय किरणापूर गावातील रोहीत्राची वितरण पेटी पोहरा नदीच्या पाण्याखाळी गेल्याने तेथील वीजपुरवठा देखील बंद करण्यात झाला होता.

नागपूर जिल्ह्यात मौदा विभागातील शारदानगर, जिजामातनगर, तरोडी, बिडगाव, गंगानगर, धानी, गुमथळा, बिडगाव, गणेश्नगर, तेरखेडा, सावनेर विभागातील कोःअळि, बाजार्गाव, निशांत ट्युब्स, उमरेड विभागातील कुही या भागातही मुसळधार पावसाने थैमान घातल्याने तेथील वीज्पुरवठा देखील काही तासांकरिता विस्कळित होता.

सहकार्याचे आवाहन 

खंडित वीजपुरवठ्याबात तक्रार नोंदणीसाठी ग्राहकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 18002-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. यासह मोबाइल अॅप आणि www.mahadiscom.in या वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER <space> Consumer Number हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाइल क्रमांकावर पाठवल्यास तक्रार नोंदवली जात असल्याचे महावितरणने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रशासन झोपले काय ? नागरिकांचे जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार काय ? - तुषार गिऱ्हे

Mon Jul 22 , 2024
– मनसे तर्फे प्रशासनाच्या विकास कामाची पोलखोल नागपूर :- नागपूर शहरातील शनिवार च्या पहाटे 20 जुलै रोजी, सकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान मुसळधार पावसाने भयंकर आतंक माजवला असून वाहतूक धारकांची, नागरिकांची दाणादान केली. तसेच नरेंद्र नगर, स्वावलंबी नगर, प्रताप नगर, गजानन नगर, येथील पावसाचे पाणी सगळ्यांच्या घरात शिरल्याने हाहाकार माजवलेला आहे. रिंग रोडच्या नरेंद्र नगरच्या पुलाखाली एवढ्या मोठ्या पावसात ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com