संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2 :- खगोलशास्त्रियांनी निर्देशित भाकीत केल्या प्रमाणे आज 2 फेब्रुवारीला एका सुंदर खगोलशास्त्रीय घटनेचा अनुभव कामठी तालुका वासीयांना घेता आला. आज सायंकाळी 7.15दरम्यान एक धूमकेतू पृथ्वीवरील आकाशातून जाताना दिसला असता आकाशाकडे लक्ष गेलेल्या कामठी तालुकावसीयांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रफिती कैद करण्यात व्यस्त दिसले तर कामठी बस स्टँड चौकातील तरुणाई मंडळी मोठ्या उत्साहाने हे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त झाले होते.
जानेवारी २०२३ च्या सुरुवातीच्या आठवड्यात सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर धूमकेतू पृथ्वीच्या वरच्या आकाशात येत आहे आणि सध्या तो सौरमालेच्या काठावर आउटबाउंड प्रवास करत आहे. त्याच्या सर्वात जवळ, धूमकेतू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ४२ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असेल, जे वैश्विक स्तरावर खूप कमी अंतर आहे. धूमकेतूला अद्वितीय बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची सूर्याभोवतीची ५० हजार वर्षांची प्रदक्षिणा.. आकाशात स्वच्छ आणि गडद आकाश असल्यामुळे धूमकेतूची शेपटी आणि हालचाल कामठीतालुकावासी पाहू शकले.तर सर्वत्र धूमकेतू दिसल्याच्या चर्चेला उधाण आले होते.