नागपूर :- फिर्यादी शेख अलताफ शेख जमील, वय ३८ वर्ष, रा. रामगड आनंद नगर, नविन कामठी, नागपूर हे परिवारासह घरी हजर असतांना आरोपी क. १) जहुर खान वल्द रहीम खान वय ६० वर्ष रा. बजराज नगर, जि झाडचोकडा, राज्य उडीसा व त्यांचे २१ साथिदार यांनी संगणमत करून गैर कायदयाची मंडळी जमवुन जुने भांडणाचे कारणावरून फिर्यादीचे कुटुंबावर शस्त्रानीशी हल्ला करून, शेख इकबाल वल्द शेख जमील वय ३७ वर्ष, वास घटनास्थळी जिवानीशी ठार मारून, समीर शेख, जहीना बी व फिर्यादी यांना जखमी केले होते. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नविन कामठी येथे कलम ३०२, ३०७, ३२४, ३२३, ४२७, ५०६, १४४, १४७, १४८, १४९, १२०(ब) भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करून त्यामध्ये एकुण २० आरोपींना अटक करण्यात आली होती व दोन आरोपी फरार होते. गुन्हेशाखा, युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार पेट्रोलॉग करीत असतांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे जहुर खान वल्द रहीम खान वय ६० वर्ष रा. बजराज नगर, जि झाड़चोकडा, राज्य उडीसा हा पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत रामगड येथे फिरत आहे. अशा माहितीवरून सापळा रखून आरोपीस ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले, आरोपीस पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे नविन कामठी यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि राहुल शिरे, पोउपनि आशिष कोहळे, राजेश लोही, पोहवा रामनरेश, गौतम रंगारी, नापोअ, राजु टाकळकर पोअ, सचिन यांनी केली.