सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देणार – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

नागपूर :- सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी.वावा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त अंशु गोयल, समाजकल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, गजेंद्र तसेच संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महानगरपालिका, समाज कल्याण, पोलीस विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या आयोगासमोर मांडल्या. यामध्ये कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना मदत, अनुकंपा भरती, पदोन्नती, सफाई कर्मचारी निवासस्थान, जात पडताळणी प्रमाणपत्र आदी विषयांबाबत निवेदन देण्यात आले.

याविषयी महापालिका आयुक्तांनी समर्पक उत्तर देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले. महापालिकेत 3 हजार 400 सफाई कर्मचारी असून त्यांना आरोग्य विषयक सेवा देण्यात येतात. तसेच शासकीय दराने वेतन व सवलती देण्यात येतात. कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या 2 कर्मचाऱ्यसांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार सहाय्य अनुदान देण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेनुसार कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मशिनद्वारे सफाई काम करण्यात येत असून सफाई कामगारांना 3 रोबोटीक मशीन उपलब्ध करुन दिल्याचे महानगर उपायुक्तांनी सांगितले.

सफाई कामगारांच्या निवासाबाबत जागेची पाहणी करुन जागा उपलब्ध करण्यात येईल. लाडपांगे आयोगाप्रमाणे सर्व सवलती देण्यात येणार असल्याचे सांगून जे सफाई कामगार लॉरी चालक झाले त्यांना सफाई कर्मचारी पुर्वपदाचा लाभ देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

सफाई कर्मचारी पदोन्नती, लाडपांगे आयोग, लाडे समिती, निवासस्थान तसेच जात पडताळणीबाबत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीशी बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. सोबतच शासनस्तरावर त्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करुन त्यांना सवलती उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता "करिअर - संधी " व्याख्यानाचे भव्य आयोजन

Sun Sep 17 , 2023
– महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता “करिअर – संधी ” व्याख्यानाचे भव्य आयोजन सावनेर :- स्थानिक लायन्स क्लब आणि भालेराव विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘भविष्यातील संधी आणि पर्याय ‘ या करिअर विषयक व्याख्यानाचे महाविद्यालयात यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील डोंगरे यांनी भूषविले तर राजेश प्रायकर, वरिष्ठ पत्रकार दै. सकाळ प्रमुख अतिथी होते. कौशल्य विकास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com