कांग्रेस च्या आझादी गौरव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 13 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून आझादीचा अमृत महोत्सव अंतर्गत अखिल भारतीय कांग्रेस कमिटीतर्फे दिलेल्या निर्देशानुसार कामठी शहर कांग्रेस कमिटी तर्फे आज 13 ऑगस्ट ला कामठी शहरातून काढण्यात आलेल्या आझादी गौरव पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या पदयात्रेत हजारोच्या संख्येतील कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जागरूक नागरिकानी सहभाग दर्शविला होता.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून राष्ट्रध्वज गर्वाने फडकविण्यास कांग्रेस चे मोठे योगदान आहे.त्यांच्या बलिदानाचे स्मरण तथा देशातील परिस्थितीची जाणीव जनतेला करून देताना देशभक्तीची भावना, राष्ट्रध्वजाप्रति प्रेम वाढीस लागावे तसेच कांग्रेस ने 1942 च्या ‘चले जाव ‘ चळवळीत केलेल्या त्यागाची आठवण जनतेला व्हावी म्हणून कांग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे मौलिक प्रतिपादन खासदार मुकुल वासनिक यांनी आझादी गौरव यात्रेचा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

सदर पदयात्रेचा शुभारंभ जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच हुतात्मा स्मारक ला खासदार मुकुल वासनिक, माजी मंत्री व आमदार सुनील केदार, कांग्रेस चे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी यांच्या मुख्य उपस्थितीत वंदन करून करण्यात आले.ही आझादी गौरव पदयात्रा आज 13 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता जयस्तंभ चौक येथून निघून यादवनगर, जयभीम चौक, इस्माईलपुरा, वारीसपुरा,फेरूमल चौक,पिली हवेली, चौक मार्गक्रमण पदयात्रा भ्रमण करीत कामठी शहर कांग्रेस कमिटी कार्यालयात थांबा घेत गादा , गुमथळा मार्गे भ्रमण करीत या पदयात्राचा समारोप करून सदर पदयात्रा मौदा कडे वळविण्यात आली.

या पदयात्रेला कांग्रेस पदाधिकारी नाना गावंडे,नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कामठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे , युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनुराग भोयर, जि प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य दिनेश ढोले, जि प सदस्य कुंदा राऊत, जि प सदस्य अवंतिका लेकुरवाडे, माजी जि प सदस्य तक्षशिलाताई वाघधरे,माजी जी प सदस्य सारिता रंगारी, माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर, माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, कांग्रेस कमिटी चे शहर अध्यक्ष कृष्णा यादव, कार्याध्यक्ष आबीद ताजी, युवक कांग्रेस पदाधिकारी मो इर्शाद शेख, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, प्रमोद गेडाम, माजी नगरसेविका ममता कांबळे, माजी नगरसेविका वैशाली मानवटकर, शहिदा कलिंम अन्सारी, मीनाक्षी बुरबुरे,दर्शना गेडाम, आशिष मेश्राम, मो सुलतान, राजकुमार गेडाम ,राजा बनसिंगे, निर्मल वानखेडे, निखिल फलके, राजेश कांबळे, अनिल पाटील, राजु खोब्रागडे, कोमल लेंढारे, नितेश यादव, मोहसीन, यासह कांग्रेस चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोल्हे हत्याकांड ; कामठी - आजनी इलाके से साजिश रचने वाला शेख शकील गिरफ्तार

Sat Aug 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – निभाई थी सक्रिय भूमिका, जमा किया था लाखों रुपए का फंड नागपुर – उमेश कोल्हे हत्याकांड में अहम भूमिका निभानेवाले 10 वें आरोपी शेख शकील को गिरफ्तार किया गया है। सूत्रों के अनुसार इस आरोपी को नागपुर के कामठी- आजनी इलाके से राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआईए) ने गिरफ्तार किया। यह किसी रिश्तेदार के घर में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights