शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस अटक

वेलतूर :- अंतर्गत १० किमी अंतरावर मौजा चन्ना येथे दिनांक ०८/०२/२०२४ चे १३.०० वा. ते १३.३० वा. दरम्यान पोलीस ठाणे वेलतुर येथे दिनांक ०८/०२/२०२४ रोजी फिर्यादी राजेश शंकरराव बारापात्रे, वय ४८ वर्ष, रा. फ्लॅट नं. २०२ जयंती मेनशन ७, बेसा, नागपुर यांनी तोडी रिपोर्ट दिली की, मौजा चन्ना येथे सार्वत्रिक लोकसभा निवडणुक – २०२४ संबंधाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाचत जनजागृती प्रचार व प्रसार करित असता आरोपी नामे-जागेश्वर बाबुराव मोटघरे वय ५५ वर्षे, रा. चन्ना ता. कुही जिल्हा नागपुर याने फिर्यादी हे शासकीय काम करित असतांना अडथळा निर्माण करून अश्लिल शब्दात शिवीगाळ केली आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. वेलतूर येथे आरोपीविरुध्द कलम ३५३, २९४, ५०६ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनी सतिश पाटील पोस्टे बेलतुर हे करीत आहे,

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक

Sat Feb 10 , 2024
कळमेश्वर :-अंतर्गत कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडीया कंपनी लिमिटेड कंपनी रेल्वे स्टेशन कळमेश्वर येथे दिनांक ०३/११/२०२३, दि. २५/१२/२०२३, दि. २७/०१/२०२४, दि. ०४/०२/२०२४, दि. ०८/०२/२०२४ दरम्यान दि. ०७/०२/ २०२४ रोजी रात्री संतोष परते यांची सेक्यूरिटी सुपरवायझर म्हणून नाईट डयूटी होती. पहाटे ०३/०० वा. सुमारास संतोष यांनी फिर्यादी नामे राजेंद्र रामरावजी भगत, वय ५० वर्षे, रा. एलॉट नं. २, हरिओम सोसायटी, झिंगाबाई टाकळी नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com