नागपूर : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांच्या वतीने 30 जानेवारी प. पू. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातियी निमीत्ताने तसेच कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाडा 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे, त्याअनुषंगाने आज 12 फेब्रुवारीला खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांच्या (Private Practitioners) च्या CME चे आयोजन सार्वजनिक आरोग्य संस्था, माताकेचेरी येथील ‘चिंतन’ सभागृहामध्ये करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अस्थिरोग तज्ञ डॉ. गोल्हर, एनकेपी साळवे तथा लता मंगेशकर हॉस्पीटल हिंगणा येथील त्वचारोग विभागाचे प्राध्यापक डॉ. पांडे, तसेच ऐआयआयएमएस येथील त्वचारोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. लाडे होते.
प्रारंभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार मनपा नागपूरचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बहेरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. दिपिका साकोरे यांच्या उद्घाटन प्रमुख्य उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास कुष्ठरोगाबाबतची माहीती देतांना देशातून आणि महाराष्ट्र राज्यातून नागपूर विभागात जास्त रुग्णसंख्या असून कुष्ठरुग्णांचे प्रमाणे कसे कमी करता येईल याबाबत सांख्यिकिय तसेच तांत्रिक सखोल माहीती डॉ. दिपिका साकोरे यांनी उपस्थितांना देवून कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्याकरीता खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांचा सहभाग खूप जास्त महत्वाचा असून त्यांनी या उपक्रमास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास नागपूर शहरातील जवळपास 52 खाजगी वैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रतिभा बांगर यांनी केले.