स्पर्धेत साकारण्यात आली “Zero Waste Event” ची संकल्पना.
वर्धा :- नगर परिषद वर्धा मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ‘स्वच्छ वर्धा-हरित वर्धा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
नप.चे मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागामार्फत चित्रकला स्पर्धा, जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, लघुचित्रफीत स्पर्धा व भिंतीचित्र स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेची सुरवात सकाळी ८ पासून नगर परिषद कार्यालयात चित्रकला स्पर्धेने झाली. वर्धा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभाग दिला. तसेच शहरातील मानस मंदिर परिसरात भिंतीचित्र स्पर्धा अंतर्गत स्पर्धकांनी सुंदर भिंतीचित्रे काढली. स्पर्धेला परीक्षक म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध चित्रकार नरेशकुमार चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते, त्यांच्या मार्फत स्पर्धकांच्या पेंटिंग व भिंतीचित्रांचे मूल्यांकन करण्यात आले. मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या सूचना व मार्गदर्शनात आरोग्य विभाग प्रमुख अशोक ठाकूर, चित्रा चाफले यांच्या उपस्थितीत चित्रकला स्पर्धा, जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, लघुचित्रफीत स्पर्धा व भिंतीचित्र स्पर्धाच्या विजयी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ “Zero Waste Event”संकल्पनेवर साकारण्यात आला.यशस्वी स्पर्धकांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रामुख्याने आरोग्य विभाग लिपिक विशाल सोमवंशी, स्वच्छता निरीक्षक सतीश पडोळे, गुरुदेव हटवार, लंकेश गोंडेकर, मयूर पात्रे व विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.