अग्निवीर सैन्य भरतीला सुरुवात..

नागपुर – विदर्भातील 10 जिल्ह्यातील अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेला रात्री १ वाजता ( दि. १७ सप्टेंबरला ) सुरुवात झाली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर या ठिकाणी ही निवड प्रक्रिया होत आहे. पावसामुळे काही वेळ ही चाचणी थांबली होती. या वेळेत सर्व उमेदवार मानकापूर येथील क्रीडा संकुलाच्या इन्डोअर स्टेडियममध्ये थांबले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनात सैन्य दलासोबत प्रशासनाने उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा या ठिकाणी बहाल केल्या आहेत.१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत दररोज रात्री बारापासून ही निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडांगणावर होणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराला आवश्यक वेळापत्रक देण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आजपासून या निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मॉर्निंग वॉकिंग करताना नगर परिषद कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यु..

Sat Sep 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 17 :- स्थानिक कामठी नगर परिषद क्रेडिट सोसायटी चे माजी अध्यक्ष व नुकतेच काल वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती प्राप्त झालेले कामठी नगर परिषद चे कर्मचारी विजय सूर्यवंशी वय 56 वर्षे रा चंद्रमनी नगर कामठी चा आज सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकिंग करून येत असताना छातीत धडक भरल्याने अकस्मात तडकाफडकी मृत्यू झाल्याची घटना घडली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights