संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद तर्फे शहरवासीयांना करण्यात येणारा पाणी पुरवठा दूषित असल्याने नागरिकांचे हाल बेहाल झाले असून घरोघरी अतिसार,गॅस्ट्रो, उलटी,हगवण, चे रुग्ण आहेत.तर काल रात्रीपासून डायरिया चा प्रकोप वाढल्याने रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 50 च्या वर रुग्ण दाखल झाले.बेड ची संख्या अपुरी पडल्याने काही रुग्णांना नाईलाजास्तव खाली जमिनीवर बेड घालून सलाईन लावून उपचार घ्यावे लागत आहे इतकेच नव्हे तर खाजगी रुग्णालयात 500 च्या जवळपास रुग्ण डायरिया,उलटी,हगवण चा उपचार घेत आहे.त्यातच कामगार नगर, रहिवासी शबाना खान शईम खान नामक 32 वर्षीय विवाहित महिला आज सकाळी दगावल्याची दुःखद घटना घडली. घटनेची माहिती हवेसारखी पोहोचताच सर्वत्र नगर परिषद प्रशासन विरोधात आक्रोश निर्माण होत यावर संतापून याप्रकारच्या जीवितहानी घटनेला ब्रेक लागावा व नागरिकाना शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जी प सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालय लयात दाखल रुग्णांची भेट घेत नगर परिषद प्रशासनाला धारेवर घेतले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद ला नगर परिषद प्रशासन विरोधात नारेबाजी करीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी तडकाफडकी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पाणी पुरवठा केंद्राजवळ लिकेज असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे कारण दर्शविले यावर उपस्थित नागरिकांनी हे कारण चुकीचे असून पाणी पुरवठा केंद्रात कुशल तंत्रिकीय मजूर नसून हवेत काम सुरू असते आणि याप्रकारच्या कृत्यामुळे नागरीकाना दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी सर्रास खेळ खेळण्यात येत आहे.यावर ठिय्या आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या जी प सभापती अवंतिका लेकुरवाडे, माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी, समाजसेवक शकिबुर रहमान, एहत्येशाम आदींनी होणारा दूषित पाणी पुरवठा तसेच शहरातील बहुतांश प्रभागात न होणारा पाणी पुरवठाची समस्या त्वरित सोडवीनेवर जोर देण्यात आला.यावर उपस्थित मुख्याधिकारी संदीप बोरकर व पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी यांनी दूषित पाणी पुरवठयामुळे दगावलेल्या महिलेच्या घटनेची दुःखद चिंता व्यक्त करीत व्यक्तिक मदत करणे, पाणी पुरवठा कंत्राटदाराचे कार्यारंभ आदेश रद्द करणे, पाणी पुरवठा शुद्ध व सुरळीत करणे, जलशुद्धी करणावर भर देणे आदींची लिखित हमी दिली तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्वरित मेडिकल ,मेयो इस्पितळात दाखल करण्याची हमी दिली.तरी नागरिकानी पाणी गरम करीत उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले.