येरखेडा ग्रामपंचायत च्या माजी उपसरपंचाचा संशयास्पद मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-31 मे पासून घरून बेपत्ता असलेल्या माजी उपसरपंचाचा चक्क मृतदेहच आढळला
कामठी ता प्र 2-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा सोसायटी न्यू येरखेडा रहिवासी भाजप चे पदाधिकारी व येरखेडा ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच मागील दोन दिवसांपासून 31 मे च्या सकाळी 9 वाजेपासून बेपत्ता असल्याची घटना घडली असता , बेपत्ता असलेल्या या इसमाचा संशयास्पद स्थितीत चक्क मृतदेहच आढळल्याची घटना आज सकाळी 10 वाजता रणाळा रोड वरील नहराजवळील मोकळ्या जागेतील एका झाडाखाली निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव जयंता यशवंत मेश्राम वय 44 वर्षे रा न्यू येरखेडा कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हे 31 मे च्या सकाळी 9 वाजेपासून घरून दुचाकी क्र एम एच 40 सी बी 0042 ने काही न सांगता निघून गेले मात्र बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने घरमंडळींनी चिंता व्यक्त करीत नातेवाईकाकडे तसेच इतरत्र शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता न लागल्याने मृतकाची पत्नी अन्नपूर्णा जयंता मेश्राम ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून मिसिंग ची नोंद करून घेत पोलिसांनी तपासाला गती दिली मात्र दोन दिवस लोटूनही शोध लागला नव्हता मात्र सदर मिसिंग असलेल्या इसमाचा मृतदेहच एका झाडाखाली आढळल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाच्या पार्थिवाजवळ एक किटनाशक द्रव्य ची बॉटल, एक बिअरची बॉटल तसेच मॅक्डोल नंबर 1 कंपनीची विदेशी दारू ची निप आढळली यावरून मृतकाने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र या संशयास्पद स्थितीत मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाला नंतरच स्पष्ट होईल.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
बॉक्स–सदर मृतक जयंता मेश्राम हे भाजप चे पदाधिकारी असून येरखेडा ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच होते.एक जवाबदार नागरिक म्हणून वावरत असताना त्यांच्या मनमिळावू स्वभाव शैलीतून त्यांनी सर्वांच्या मनात आपुलकीची जागा केली होती.मात्र या घटनेने सर्वांना एकच धक्का बसला असून कुठल्या मानसिक तणावातून ही घटना घडली हा चर्चेचा विषय असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतकाच्या मित्रमंडळी च्या वतीने करण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com