संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी शहरातील समस्या सोडविणार कोण?अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 3 हद्दीत येणाऱ्या नागसेन नगरात सार्वजनिक शौचालयाचे दार तुटलेले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिसरात कचरा पडलेला आहे या अस्वछतेअभावी व सार्वजनिक शौचालयाच्या साफ सफाई अभावी परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात प्रभागातील माजी नगरसेवकांना सदर समस्या सोडविण्याची तजवीज केली असता आमचा कार्यकाळ संपला आहे असे सांगून जवाबदारी झटकट आहेत तर नगर परिषद ला यासंदर्भात निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासन यावर कुठलेही दखल घेत नसल्याने कामठी नगर परिषद च्या प्रशासकीय राजवटी समोर येथिल जनता हतबल व नाखूष आहे तेव्हा ह्या समस्या सोडविण्यासाठी दाद मागावी कुठे असा विचार पडला असून शहरातील समस्या सोडविणार कोण?अशी विचारणा येथील जनसेवक आशिष मेश्राम सह जागरूक नागरिक करीत आहेत. साधारणता पंचवार्षिक काळ संपला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होतात. किमान सहा महिन्यांच्या आत निवडणुका होणे अपेक्षीत असेच मानले जाते मात्र कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपून जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मुहूर्त अद्यापही ठरलेला नाही.त्यामुळे सर्व कामकाज पाहण्यासाठी नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे परंतु नगरसेवक नगरसेवक नसताना प्रशासकाच्या हाती असलेल्या राजवटीत विकासाच्या नावाखाली होत असलेल्या कामावर शहरातील जनता हतबल झाली आहे.सांगितलेल्या समस्याही मार्गी लागत नसल्याने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार तरी कोण?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.
कामठी शहरातील समस्यांच्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत मात्र आता ऐकणारे कुणीच नाही असा सूर आता नागरिकामधून उमटत आहे. शहरातील प्रभाग क्र 3 मध्ये अनेक भागात साफसफाई झालेली नाही यासंदर्भात नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या अधिनस्थ विभागाला प्रभाग क्र 3 येथे सार्वजनिक शौचालय साफ करणे, नाल्या साफ करणे,साचलेला कचरा उचलणे अशा विविध समस्येशी अवगत करून निर्माण होणाऱ्या रोगराईला ब्रेक लावावा अशी मागणी करण्यात आली मात्र नगर परिषद प्रशासन कुठलेही काम न करता नगर पालिका फक्त कर गोळा करण्याचे काम मात्र नियमित करीत आहे.