प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- श्री. गजानन शिक्षण सेवा संस्था नागपूर द्वारा संचालित प्रिआंती इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) येथे 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण रमेश लेकुरवाळे सचिव( श्री. गजानन शिक्षण सेवा संस्था नागपुर,) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इंग्लिश आणि जी के ऑलिम्पियाड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांचा आणि खासदार क्रीडा महोत्सवामध्ये पारितोषिक पटकविणाऱ्या विध्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सुवर्ण पदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य,देशभक्तीपर गीत व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले

कार्यक्रमाला ऋषभ राऊत (सामाजिक कार्यकर्ते)  काशीनाथ खोंडे उपाध्यक्ष शि.पा. संघ कार्यकारिणी समिती सतिश बर्डे , शंकराजी घुले , संगीता भोयर (माजी उपाध्यक्ष शि.पा सं का समिती ) प्राचार्या नंदा ठाकरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी , पालक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायकल रॅलीतून मतदार जनजागृतीचा संदेश

Fri Jan 26 , 2024
चंद्रपूर :- निवडणुक हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार सर्वांनी निर्भीडपणे बजावून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आगामी निवडणुकीत मतदान करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com